hypertension
*तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं* *एक काळ असा होता जेव्हा हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा आजार वृद्ध लोकांशी संबंधित मानला जात होता,* परंतु आता ही परिस्थिती वेगाने बदलत आहे. आजच्या काळात हाय ब्लड प्रेशर ही विशेषतः तरुणांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे एका *सायलेंट किलर'* सारखं आहे जे शरीराला हानी पोहोचवतं आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत. आरोग्याशी संबंधित अनेक रिपोर्टमधून असं दिसून आलं आहे की, *हाय ब्लड प्रेशर ही केवळ ब्लड प्रेशरची समस्या नाही तर ती मेटाबॉलिक डिसफंक्शन, सबक्लिनिकल एथेरोस्क्लेरोसिस आणि फॅटी लिव्हर सारख्या अनेक गंभीर आजारांशी देखील संबंधित आहे.* सामान्य आरोग्य चाचण्यांमध्ये या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. तज्ज्ञांच्या मते, कधीकधी हृदयासंबंधित आजाराची सुरुवातीची लक्षणं अशा लोकांमध्ये देखील आढळतात ज्यांच्यामध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. तसेच काही लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या देखील आढळून आली. हाय ब्लड प्रेशरच्या वाढत्या धोक्याबद्दल दिल्लीतील...