जेवन भांडी
जेवण तयार करण्यासाठी कोणत्या धातूची भांडी योग्य / अयोग्य आहेत ? कि धातूच्या भांड्यात जेवण बनवूच नये ? मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने होणारे फायदे कोणते ?
समस्त भूतलावर मनुष्य प्राणी हा एकमेव असं प्राणी आहे कि जो आपले अन्न निरनिराळ्या प्रकारे शिजवून खातो.तरीही इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त वेळा आजारी पडतो.आपण जे खातो ,ज्या प्रकारे खातो आणि ज्या प्रकारे अन्न बनवून खातो या सर्वांचा आपल्या शरीरावर काही न काही परिणाम नक्कीच होत असतो.
✅
इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज स्वस्त आणि मस्त आहेत म्हणून ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत.
आजकाल अन्न शिजविण्यासाठी सर्रास अल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर केला जात आहे.खूप संशोधनानंतर आणि मतमतांतरा नन्तर अल्युमिनियमची भांडी आरोग्यासाठी हानिकारक आहेत हेच सिद्ध झालं आहे.
✅
अल्युमिनियम बॉंक्साईड पासून बनते.जेवण बनवतांना चमच्याने साधं ढवळतांना किंवा भाजी परततांना अल्युमिनियमच्या भांड्यावर सूक्ष्म ओरखडे उठून अल्युमिनियम चा अंश मिलीग्राम मिलीग्राम करत आपल्या जेवणात मिसळला जातो.सरासरी हेच प्रमाण प्रतिदिन अन्नातून साधारणतः ५ मिलिग्रॅमएवढे अॅल्युमिनीयम सेवन केले जाते.
✅
मानवी शरिरामध्ये अशा धातूंना बाहेर काढून टाकण्याची मर्यादित क्षमता असते. या क्षमतेच्या बाहेर शरिरामध्ये असे धातू गेल्यास ते मांसपेशी, मूत्रपिंडे, यकृत (लिव्हर), हाडे इत्यादी ठिकाणी हळूहळू साठू लागतात. अॅल्युमिनीयम धातू मेंदूच्या पेशींवरही हानीकारक परिणाम करतो. अशा प्रकारे शरिरामध्ये साठत गेलेले अॅल्युमिनीयम स्लो पॉयझन बनते.
✅
नैराश्य, चिंता, काळजी, स्मृतीलोप, हाडांशी संबंधित आजार (ऑस्टीओपोेरोसिस), डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडांची क्षमता घटणे, अतिसार, अतिआम्लता (हायपरअॅसिडटी), अपचन, पोटदुखी, आतड्याला सूज येणे (कोलायटिस), वारंवार तोंड येणे, इसबसारखे (एक्झिमासारखे) त्वचारोग होतात.अॅल्युमिनियम हा धातू मेंदूंच्या पेशींवर हानीकारक परिणाम करतो.
✅
अलीकडच्या काळात नॉनस्टिक भांड्यांचा वापर खूप वाढला आहे. या प्रकारच्या भांड्यांमध्ये धातूवर टेफलॉनचे आवरण लावलेले असते. अशी भांडीसुद्धा जपून वापरणे गरजेचे असते. टेफलॉनचा स्तर निघून गेलेला असल्यास किंवा अर्धवट निघालेला असल्यास ती वापरू नयेत. कारण अशा भांड्यात अन्न शिजवल्यास टेफलॉन अन्नामध्ये मिसळू शकते, जे आरोग्यास घातक असते.
आता तुम्ही म्हणाल अॅल्युमिनीयम ला पर्याय काय ?
✅✅
अॅल्युमिनीयम च्या भांड्याऐवजी स्टील,लोखंड,तांबा ,पितळ आणि सर्वोत्तम म्हणजे मातीची भांडी वापरावीत.
स्टीलची आपल्या अन्ना बरोबर कोणतीच प्रक्रिया होत नाही म्हणून स्टीलची भांडी वापरू शकतो पण स्टीलच्या भांड्याचे ज्याप्रमाणे नुकसान नाही त्याचप्रमाणे फायदेही नाही.
✅✅
तांब्याची किंवा पितळेची भांडी जर काळी केलेली असतील तरच जेवण तयार करण्यासाठी वापरावीत .आंबट पदार्थ या भांड्यांमध्ये चुकुनही शिजवू नयेत किंवा खाऊ नयेत .
✅✅
लोखंडाची भांडी अन्न शिजवतांना वापरल्यास त्यातील लोह्तत्व अन्नात उतरून शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते .परिणामी शरीराची ऑक्सीजन वाहून नेण्याची क्षमता वाढून शरीर निरोगी राहते.
✅✅
आता बघूया मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने होणारे फायदे .✅✅
जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरल्यासशरिराला आवश्यक ती खनिजे जेवणातून मिळतात. मातीच्या भांड्यांत बनवलेल्या जेवणाची चव ज्याने चाखली, तो पुन्हा कधीही इतर भांड्यांचा विचारही करणार नाही.
✅
मातीच्या भांड्यात जेवण हळू हळू शिजते त्यामुळे ते अधिक रुचकर आणि आरोग्यदायी बनते .मातीची भांडी आजकाल बाजारात हळू हळू का होईना पण उपलब्ध होत आहेत .
✅
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो. असं म्हटलं जात की मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्व नष्ट होत नाही.
✅
अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्वे कमी हतोता. पितळेच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात. केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात.
Comments
Post a Comment