जेवन भांडी
जेवण तयार करण्यासाठी कोणत्या धातूची भांडी योग्य / अयोग्य आहेत ? कि धातूच्या भांड्यात जेवण बनवूच नये ? मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने होणारे फायदे कोणते ? समस्त भूतलावर मनुष्य प्राणी हा एकमेव असं प्राणी आहे कि जो आपले अन्न निरनिराळ्या प्रकारे शिजवून खातो.तरीही इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त वेळा आजारी पडतो.आपण जे खातो ,ज्या प्रकारे खातो आणि ज्या प्रकारे अन्न बनवून खातो या सर्वांचा आपल्या शरीरावर काही न काही परिणाम नक्कीच होत असतो. ✅ इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज स्वस्त आणि मस्त आहेत म्हणून ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. आजकाल अन्न शिजविण्यासाठी सर्रास अल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर केला जात आहे.खूप संशोधनानंतर आणि मतमतांतरा नन्तर अल्युमिनियमची भांडी आरोग्यासाठी हानिकारक आहेत हेच सिद्ध झालं आहे. ✅ अल्युमिनियम बॉंक्साईड पासून बनते.जेवण बनवतांना चमच्याने साधं ढवळतांना किंवा भाजी परततांना अल्युमिनियमच्या भांड्यावर सूक्ष्म ओरखडे उठून अल्युमिनियम चा अंश मिलीग...